Chatrapati Sambhaji Nagar : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली; दौरा अर्धवट सोडून दवाखान्यात दाखल

521 0

संभाजी नगर : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. जरांगे पाटील यांचा दौरा सुरू होता मात्र अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने छत्रपती संभाजी नगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलंय. तर त्यांच्या प्रकृती बद्दलची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

 

डॉक्टरकडून जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली असून ऊन वाढत असल्यामुळे अशक्तपणा जाणवत असल्यामुळे जरांगे पाटील रुग्णालयात दाखल आहेत. महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून आरक्षणाची मागणी होत असल्याने गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे या मागणीचे नेतृत्व करत आहेत. या मागणीबाबत आता मनोज जरांगे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून आंदोलन सुरू करण्याची गर्जना केली असून यासाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Uttarakhand : चारधाम यात्रेदरम्यान रील बनवण्यावर बंदी; नवीन नियम केले जाहीर

Mumbai Lok Sabha : मुंबईत नरेंद्र मोदी आणि शरद पवार आमने सामने; आज पार पडणार दोघांच्याही प्रचार सभा

Loksabha Elections : राज्यात ड्राय डेची घोषणा; ‘ या’ दिवशी बंद असणार मद्यविक्री

Pune News : पुणे हादरलं! कोथरूड परिसरात कोयत्याने तरुणाची निर्घुण हत्या; काय आहे नेमकं प्रकरण

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!