Babanrao Taiwade

Reservation : ओबीसी नेते डॉ. तायवाडे यांच्या विरुद्ध ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल

439 0

नागपूर : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीमधून आरक्षण (Reservation) देण्याचा आग्रह मनोज जरांगे पाटील यांचा आहे, तर ओबीसीमधून आरक्षण न देता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी ओबीसी नेत्यांची आहे. या मुद्यांवरून सध्या राज्यात जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांमध्ये वैयक्तिक टीका-टिप्पणी सुरू झाली आहे.

हिंगोली येथील ‘ओबीसी एल्गार मेळाव्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्यासह इतर ओबीसी नेत्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटलांना लक्ष्य केले. तायवाडे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याची तक्रार झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विकी भगवानराव उरेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणाले होते डॉ. बबनराव तायवाडे?
“तुम्ही आमच्यावर खोटे आरोप करता. आमच्या नेत्याला ( छगन भुजबळ ) शिवीगाळ करता. पण, त्यांना शिवीगाळ करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आमच्या नेत्याकडे बघणाऱ्याचा डोळा काढण्याची ताकद ओबीसींमध्ये आहे. त्यामुळे कुणी तशी हिंमत करू नये. आमची लायकी काढत आहात. यांना आमची लायकी काढण्याचा अधिकार कुणी दिला? ओबीसी, एससी, एसटी या तीन जातींचा जरांगे-पाटील अपमान करत आहे. आमची लायकी नाही, तर आमच्या पंक्तीत कशासाठी येत आहात? लायकी काढण्याची हिंमत कराल, तर महाराष्ट्रात फिरणे बंद करू.” असा इशारा डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द; ‘हे’ कारण आले समोर

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला ऑरेंज अलर्ट

Palghar News : धक्कादायक! क्रिकेट सामना बघताना वाद झाला अन् तरुण जीवानिशी मुकला

Solapur News : खळबळजनक ! कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या PSI ला अटक

IPL Auction Registration : आयपीएल लिलावासाठी ‘एवढ्या’ खेळाडूंनी केली नोंदणी

Satara News : आई-लेकराची झाली चुकामुक ! विहिरीत आढळले बिबट्याचे पिल्लू

Share This News
error: Content is protected !!