Sangli Loksabha

Sangli Loksabha : मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना मोठा धक्का; ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

420 0

सांगली : सांगलीच्या राजकीय वर्तुळातुन (Sangli Loksabha) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि त्यांच्या समर्थकांविरोधात आचारसंहिता भंग केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवाना प्रचार पदयात्रा काढल्यानं चंद्रहार पाटील व त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

24 एप्रिल रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 या वेळेत खटाव, बेडग गावात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ही पदयात्रा काढण्यात आली होती. या प्रकरणात चंद्रहार पाटील आणि त्यांच्या दोन ते तीन कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगलीत रंगणार तिरंगी लढत
सांगलीमध्ये यावेळी तिरंगी लढत होणार आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीने चंद्रहार पाटील यांना तर भाजपने संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर अपक्ष म्हणून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी फॉर्म भरला आहे. त्यामुळे या ठिकाणी चंद्रहार पाटील, संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे या मतदार संघात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Rohit Patil : रोहित पाटलांना मोठा धक्का ! फेसबुक पेज झाले हॅक

Weather Update : पुढील 3 दिवस महत्वाचे ! हवामान खात्याने दिला ‘हा’ नवा अलर्ट

Varsha Gaikwad : उत्तर मध्य मुंबई मधून कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

Ajit Pawar : अजित पवार यांना ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट

Loksabha Election : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; ‘या’ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Supreme Court : निवडणूक ईव्हीएम वरचं होणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!