Shinde Fadanvis

Cabinet Expansion News : शिवसेना-भाजपचा नवा मित्र कोण? राज्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता?

244 0

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला (Cabinet Expansion News) आज वेग आला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर (Cabinet Expansion News) सध्या राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी आज भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडत आहेत. तर एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. येत्या 8-9 जुलै रोजी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणे CA ला पडलं महागात; पोलिसांनी केली मोठी कारवाई

मंत्रिमंडळ विस्तारात धक्का तंत्राचा वापर
सध्या राज्याचा कारभार 20 मंत्री हाकत आहेत. तर मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion News) आणखी 23 नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना-भाजपसाठी 12 मंत्रिपदं आणि 10 मंत्रिपदं ही सोबत येणाऱ्या मित्रपक्षांसाठी राखीव ठेवले जाऊ शकतात. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 40 जागा जिंकण्याचं भाजप-शिवसेना युतीचं लक्ष्य आहे. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता 40 जागा जिंकणे सेना-भाजप युतीसाठी कठीण जाईल अशी शक्यता आहे.

जर त्यांना लोकसभेच्या 40 जागा जिंकायच्या (Cabinet Expansion News) असतील तर इतर पक्षातील बड्या नेत्यांना सोबत घ्यावं लागेल. दिल्ली आणि राज्यातील भाजपचे बडे नेते इतर पक्षातील काही नेत्यांशी चर्चा करत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. भाजपचा हा प्लान यशस्वी झाला तर आगामी काळात राज्यात मोठी उलथापालथ पाहायला मिळून शकते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!