Sanjay Gaikwad

Sanjay Gaikwad : ‘तर मी बुलढाणा लोकसभेची निवडणूक लढवणार’, संजय गायकवाड यांचे भाजपला खुलं आव्हान

636 0

बुलढाणा : भाजपकडून बुलढाण्यात लोकसभा निवडणुकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये बुलढाण्यात जी लोकसभेची जागा आहे, ती चार नंबरवर दाखण्यात आली असून खासदार प्रतापराव जाधव निवडून येणार नसल्याचं म्हटलं. यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपला खुलं आव्हान दिले आहे. ‘जर ही जागा भाजपने घेतली तर मी या लोकसभेची निवडणूक लढवेन आणि जिंकेनही’, असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.

संजय गायकवाड नेमके काय म्हणाले?
‘बुलढाण्यातील लोकसभेची जागेची मागणी सध्या भाजपकडून होत असल्याचं म्हटलं जात आहे. सर्वेक्षणामध्ये ही जागा चार नंबवर दाखवल्याने ही जागा आम्हाला द्या असं भाजपचं म्हणण आहे. ही जागा शिंदे गटाकडे असल्यामुळे ती जागा निवडून येणार नाही, त्यामुळे ती जागा आम्ही लढवतो. पण शिवसेनेची लोकसभेची जागा देणार नाही, तिथे खासदार प्रतापराव जाधवच निवडून येतील. पण जर प्रतापराव जाधव जर निवडून येत नसतील तर आम्ही ही जागा लढायला तयार आहोत. माझा सर्वे करा, मग तुम्हाला समेजल की नक्की काय आहे ते. मी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काही इच्छुक नाही, पण प्रतापराव जाधवांना उमेदवारी दिली नाही तर शिवसेनेची जागा राखण्यासाठी मी तो निर्णय घेऊ शकतो’, असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!