BJP Video

BJP Video : पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर ! भाजपा विधानसभा प्रमुखाला भाजपाच्याच कार्यकर्त्यांकडून मारहाण

576 0

बुलढाणा : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी लागला. यामध्ये 4 राज्यांपैकी 3 राज्यात भाजपने (BJP Video) एकहाती सत्ता मिळवली. देशभरातील भाजपा कार्यकर्ते जल्लोष करत असताना बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात भीषण चित्र पाहायला मिळाले. भाजपाच्या मेहकर तालुका अध्यक्ष निवडीवरून भाजपाच्याच दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

भाजपा पदाधिकाऱ्यांनी भाजपा विधानसभा संपर्क प्रमुखांना पक्षाच्या कार्यालयात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. एवढेच नाहीतर इतर काही ज्येष्ठ भाजपा पदाधिकाऱ्यांनाही जबर मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. मारहाणीनंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि दोघांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पक्षाने एकाच तालुक्यासाठी दोन तालुकाध्यक्ष निवडल्यामुळे हा वाद झाला आहे. बुलढाण्यात भाजपाचे जिल्हाप्रमुख प्रकाश गवई हे मेहकर येथे विधानसभा संपर्क प्रमुखांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेणार होते. त्याआधी प्रल्हाद लष्कर यांच्यासह 20 ते 25 भाजपा कार्यकर्त्यांनी प्रकाश गवई आणि इतर भाजपा पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला. यामुळे बुलढाणा भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Pune Accident : आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसून भीषण अपघात

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला

Money Rain Pune : हडपसरमध्ये पैशांचा पाऊस पाडतो ,अशी बतावणी करून 18 लाख रुपयांची कॅश घेऊन 4 जण पळाले

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; IMD ने वर्तवला अंदाज

Pune Indapur Murder : पुणे हादरलं ! अनैतिक संबंधांच्या संशयातून अपहरण करून तरुणाची हत्या

Mount Merapi Volcano : माऊंट मेरापी ज्वालामुखीच्या उद्रेकात 11 गिर्यारोहकांचा मृत्यू

Lalit Patil : ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट ! येरवडा कारागृहाचे डॉक्टर संजय मरसाळे यांना पुणे गुन्हे शाखेकडून अटक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!