पुणे : पुणे जिल्ह्यातून (Pune Indapur Murder) एक धक्कादायक घटना समोर आली. यामुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पंधारवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. गणेश लक्ष्मण शिंदे (वय 33), मच्छिंद्र लक्ष्मण शिंदे (वय 30), आकाश सुरेश शिंदे (वय 22) (सर्व रा. पंधारवाडी, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. वैभव शिवाजी पारेकर (वय 26 रा. पंधारवाडी) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
28 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शिवाजी पारेकर हे आपली पत्नी कांताबाई व मुलगा वैभव यांच्या समवेत जेवण करून बसले असताना वरील तीनही आरोपी घरी आले. यामध्ये गणेश शिंदे याने घरात येऊन ”आपल्याला भांडगाव येथे जायचे आहे. तू आमच्या सोबत चल”, असं वैभवला सांगितले. वैभवने आपण तिघांबरोबर भांडगावला चाललो आहे असे वडिलांना सांगितले. यानंतर वैभव गणेशने आणलेल्या कारमधून आरोपींबरोबर निघून गेला. रात्री उशिरापर्यंत तो आला नाही. त्याची वाट पाहून सकाळची इतर कामे उरकून फिर्यादी आरोपींच्या घरी जाऊन आले. तेव्हा ते तिघे देखील रात्रीपासून घरी आले नाहीत, असं त्यांच्या घरच्यांनी फिर्यादी यांना सांगितलं.
यानंतर वैभवच्या वडिलांनी आरोपींविरुद्ध इंदापूर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला. ज्या दिवशी आरोपी वैभवला आपल्यासमवेत घेऊन गेले, त्याच दिवशी त्यांनी बाह्यवळण रस्त्यापासून काही अंतरावर बेडशिंगे गावच्या हद्दीत धारदार हत्याराने वार करुन त्याची हत्या केली होती. त्याचा मृतदेह चारचाकीच्या डिक्कीत रात्रभर ठेवला. घरी आल्यानंतर सकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास ते त्या चारचाकीतून थेट 70 किलोमीटर अंतर पार करत शिंगणापूरच्या दिशेने गेले. शिंगणापूर ते दहिगाव दरम्यान वावरहिरे (ता.माण जि.सातारा) या गावच्या हद्दीत रस्त्यापासून साधारण दोनशे मीटर अंतरावर डोंगरदऱ्यातील माळावर खड्ड्यात त्यांनी वैभवचा मृतदेह पुरला. तेथून ते परत पंधारवाडीत आले होते अशी कबुली आरोपींनी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार करत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Accident : आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसून भीषण अपघात
Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला
Money Rain Pune : हडपसरमध्ये पैशांचा पाऊस पाडतो ,अशी बतावणी करून 18 लाख रुपयांची कॅश घेऊन 4 जण पळाले