राज्यसभेच्या ६ जागांसाठी राज्यात सुरु असलेली धुळवड अखेर संपली असून सहा जागांपैकी 3 जागेवर महाविकास आघाडीने बाजी मारली असून भाजपच्या पदरात 3 जागा मिळाल्या आहेत. शिवसेच्या संजय पवार यांचा मात्र धक्कादायक पराभव झाला आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान पूर्ण झाले. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली होती. या निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते .त्यामुळे या निवडणुकीत भाजपा, शिवसेना यापैकी कोणाचा उमेदवार पराभूत होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या निवडणुकीत भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक ४१ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा 33 मतांनी पराभव केला. महाविकास आघाडीची नऊ मते फुटली.