Viral Video

Viral Video : “ए भ**, दहशतवादी..बाहेर फेका याला”, भाजपा खासदाराची घसरली जीभ

808 0

संतापाच्या भरात अनेक राजकीय नेतेमंडळींची जीभ घसरल्याच्या घटना (Viral Video) आपण अनेकदा पहिल्या असतील. यामुळे अनेक नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे आपण पाहिले असेल. पण आता भाजपच्या एका खासदार महोदयांनी भर लोकसभेत केलेली शिवीगाळ केली. त्यांची ही चूक देशाच्या संरक्षणमंत्र्यांना निस्तरावी लागली आहे. भाजपा खासदार रमेश बिधुरी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्या भाषेवर तीव्र आक्षेप घेतला आहे.

18 ते 21 सप्टेंबर या कालावधीमध्ये लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक व नव्या संसद भवनातून कामकाजाला सुरुवात या दोन प्रमुख गोष्टी घडल्या. त्याशिवाय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी चांद्रयान ३ मोहिमेवरही दोन्ही बाजूच्या सदस्यांनी कौतुक करणाऱ्या भूमिका मांडल्या. मात्र, याचवेळी काही सदस्य आक्रमक झाल्याचंही दिसून आलं. भाजपाचे दक्षिण दिल्लीतील खासदार रमेश बिधुरी हे त्यातलेच एक. बिधुरींनी आपल्या भाषणात चक्क शिवीगाळ केली. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय म्हणाले रमेश बिधुरी?
रमेश बिधुरी यांनी आपल्या भाषणात मोदींनी श्रेय लाटलं नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, यावर विरोधी बाकांवरून काही टिप्पणी होऊ लागताच बिधुरी भडकले. “मोदीजी श्रेय घेत नाहीयेत. श्रेय देशाचे वैज्ञानिक घेत आहेत. ए भ**…ए उग्रवादी..बोलू देणार नाही तुला कधी उभं राहून. सांगून ठेवतोय. ए उग्रवादी..कठुवे…हे दहशतवादी आहेत… उग्रवादी आहेत.. हे मुल्ला दहशतवादी आहेत. याचं काही ऐकू नका, बाहेर फेका याला”, असं रमेश बिधुरी म्हणत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Share This News
error: Content is protected !!