sanjay raut and nitesh rane

Nitesh Rane : …उद्धव ठाकरेंचे कपडे फाडणार; नितेश राणेंची राऊतांना धमकी

397 0

मुंबई : भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल (bjp-leader-nitesh-rane-criticizes-sanjay-raut) केला आहे. त्यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत हि टीका केली आहे. यावेळी नितेश राणे यांनी टीका करताना संजय राऊत यांना धमकी दिली.’तू आमच्या नेत्यांवर टीका कर मी तुझ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडणार’ असा इशारा नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडावेत अशी संजय राऊत यांची इच्छा दिसते असा उपरोधिक टोलादेखील नितेश राणे यांनी लगावला आहे.

नितेश राणे नेमके काय म्हणाले?
‘तू आमच्या नेत्यांवर टीका कर मी तुझ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडणार’ असा इशारा नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी अलिबागमध्ये दमदाटी करून जागा घेतली. कोट्यवधी रुपयांची जमीन त्यांनी अवघ्या काही रुपयांमध्ये घेतली असा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला.

संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार’, नितेश राणेंचे खळबळजनक वक्तव्य

पत्राचाळी प्रकरणावरून साधला निशाणा
पत्राचाळ प्रकरणावरूनदेखील नितेश राणे यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. मराठी माणसांची पत्राचाळमध्ये संजय राऊत यांनी घरे लाटली त्याप्रकरणात त्यांची आज कोर्टात हजेरी आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांचा कैदी नंबर 8959 असा उल्लेख देखील केला.

Share This News
error: Content is protected !!