Supriya Sule

Supriya Sule : ‘भाजप म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी’, सुप्रिया सुळेंचा जोरदार हल्लाबोल

733 0

मुंबई : मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याला शरद पवार, जयंत पाटील, अनिल देखमुख, सुप्रिया सुळे (Supriya Sule), राजेश टोपे उपस्थित आहेत. यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
‘आपण सत्तेत असताना बाळ मरणार असतील तर अशा सरकारचा काय उपयोग आहे. पालकमंत्रिसाठी तो दिल्ली समोर झुकत नाही. मी डीसीएम वन बद्दल बोलतेय. राज्याचा मंत्री हा संपूर्ण राज्याचा असतो. हे पालकमंत्रिसाठी भांडतात. अरे सोच बडी करो. शिवसेना- शिवसेना नो भांडण, राष्ट्रवादी राष्ट्रवादी नो भांडण.. भांडण फक्त भ्रष्ट जुमला पार्टी बरोबर आहे, असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

‘ते भाजप नाही. भ्रष्ट जुमला पार्टी आहे. माझी लढाई ही फक्त आणि फक्त भाजपशी आहे. स्वागत करायला मी जाईन. मी हार घालायला जाईल माझा भाऊ आहे, माझा हक्क आहे. मला आनंद यातच आहे की चांदीच्या ताटात जेव्हा जेवण वाढले जाते तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोक पुढे असतातच, असंही सुळे म्हणाल्या. त्यांचे हेडगेवार हळूहळू कमी होत आहेत. हळूहळू या सरकारमध्ये चव्हाण साहेबांचा फोटो मोठा होतो आहे याचा मला अभिमान आहे, असं म्हणत सुळेंनी भाजपला टोला लगावला.

Share This News
error: Content is protected !!