BJP

BJP : भाजपकडून चार राज्यांचे नवे निवडणूक प्रभारी जाहीर ! ‘या’ मंत्र्यांवर देण्यात आली जबाबदारी

1258 0

मुंबई : सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने (BJP) आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयारी सुरू केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांसाठी शुक्रवारी नवे निवडणूक प्रभारी आणि सह प्रमुख नियुक्त केले आहेत. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि आरोग्यमंत्री मनसुख मांडविया या वजनदार केंद्रीय मंत्र्यांना संघटनात्मक जबाबदारीकडे वळवण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी सरकार मधील संभाव्य फेरबदलानंतर मंत्रिमंडळातून या नेत्यांची नाव वगळण्यात येतील, अशी चर्चा आहे.

Pune Suicide News : धक्कादायक ! सुसाईड नोट मध्ये भावाकडे शेवटची इच्छा व्यक्त करीत पुण्यात पोलिसाची आत्महत्या

प्रत्येक राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले जातात. भाजपच्या घटनेनुसार हे प्रभारी नेते राज्यातील नेते आणि केंद्र यातील सेतू किंवा पूल म्हणून काम करतात. निवडणुकीपुरतीच त्यांची त्या राज्यात भूमिका असते. कोणत्या राज्यासाठी कोणाची प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे पाहुयात..

Shah Rukh Khan : शाहरुख खानने रचला विक्रम! ‘जवान’ अन् ‘डंकी’ने रिलीजआधी केली एवढ्या कोटींची कमाई

प्रल्हाद जोशी यांना राजस्थानचे निवडणूक प्रभारी करण्यात आलं आहे.
गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि हरियाणाचे नेते कुलदीप बिश्नोई यांना सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
भाजपचे (BJP) राष्ट्रीय उपाध्यक्ष ओ. पी. माथूर यांची छत्तीसगडचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची छत्तीसगडचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांची मध्य प्रदेशचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मदतीला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सहनिवडणुक प्रभारी करण्यात आलं आहे.
माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांची तेलंगणाच्या निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय सरचिटणीस सुनील बन्सल यांना सहनिवडणूक प्रभारी बनवण्यात आलं आहे.

Share This News
error: Content is protected !!