Ajit Pawar

Ajit Pawar : अजितदादा मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची रेघ; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

574 0

बुलडाणा : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी करत महायुतीला पाठिंबा दिला. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदासह अर्थमंत्रिपद देखील देण्यात आलं. तसेच राष्ट्रवादीच्या आठ बड्या नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी देखील लागली. तेव्हापासूनच अजित पवार हे मुख्यमंत्री होणार या चर्चाना उधाण आले आहे. सुरू असलेल्या या चर्चेमुळे अनेकदा शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. यादरम्यान आता माजी मंत्री आणि अजित पवार समर्थक नेते राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले राजेंद्र शिंगणे ?
अजित पवार हे एक दिवस नक्की मुख्यमंत्री होतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मात्र ते कधी मुख्यमंत्री होणार याबाबत आत्ता काही सांगता येणार नाही. मुख्यमंत्री होण्यासाठी 145 चा आकडा लागतो हे खरं आहे, मात्र अजित पवार तो आकडा लवकरच गाठतील असं शिंगणे यांनी म्हटलं आहे. शिंगणे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

अजित पवार यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यापासूनच त्यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू आहे. यावरून शिवसेनेच्या आमदारांकडून अनेकदा नाराजी देखील व्यक्त करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याचं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.

Share This News
error: Content is protected !!