मोठी बातमी : कसबा चिंचवड पोटनिवडणूकीतून संभाजी ब्रिगेडची माघार; महाविकास आघाडीला संभाजी ब्रिगेड करणार मदत
पुणे : सध्या कसबा आणि चिंचवड मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या रणधुमाळी सुरु आहे. सर्व प्रमुख पक्षांनी उमेदवार जाहीर केले असून, आज संभाजी ब्रिगेडने कसबा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. सचिन अहिर यांची शिष्टाई कामाला आली असून, महाविकास आघाडीला संभाजी ब्रिगेड मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.
