India Alliance

India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा निर्णय ! 10 चॅनल्सच्या 14 अँकर्सना केलं बॉयकॉट

737 0

विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A आघाडीने (India Alliance) 10 न्यूज चॅनल्सच्या एकूण 14 टीव्ही अँकर्सना बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाहीतर त्यांनी या टीव्ही अँकर्सची यदेदेखील जाहीर केली आहे. यामध्ये सुधीर चौधरी, अर्णब गोस्वामी, चित्रा त्रिपाठी, अदिती त्यागी, अमन चोपडा, अमीश देवगन, आनंद नरसिंहा, अशोक श्रीवास्तव, गौरव सावंत, नविका कुमार, प्राची पाराशर, रुबिका लियाकत, शिव अरूर आणि सुशांत सिन्हा या अँकर्सचा समावेश आहे.

यासंदर्भात, काँग्रेसने सोशल मिडियावर एक निवेदन जारी करत म्हटले आहे, “रोज सायंकाळी 5 वाजता काही टीव्ही चॅनल्सवर द्वेषाचा बाजार भरवला जातो. यामुळे, आम्ही द्वेशाच्या बाजारात ग्राहक बनून जाणार नाही,” असे INDIA आघाडीने ठरवले आहे. आमचा उद्देश आहे ‘द्वेश मुक्त भारत’. “जुडेगा भारत, जीतेगा INDIA.”

गेल्य 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईमध्ये विरोधी आघाडीची तिसरी बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांसह एकूण 28 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत समन्वय व प्रचार समितीसह एकूण 5 समित्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली 5 सप्टेंबरला दिल्ली येथे I.N.D.I.A च्या कॅम्पेन कमिटीची पहिली बैठक पार पडली. यात मध्य प्रदेशसह 5 राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या तयारीसंदर्भात चर्चा झाली.

Share This News
error: Content is protected !!