Ajit Pawar

अजित पवारांनादेखील भाजपमध्ये यायचं होतं’; ‘या’ आमदाराचा दावा

706 0

छत्रपती संभाजीनगर : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे अजित पवारांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. तसेच संजय शिरसाट यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले संजय शिरसाट ?
2019 ची निवडणूक युतीत लढलो. निकालानंतर सर्व आमदार मातोश्रीवर गेलो. आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की आम्हाला भाजपसोबत जायचं नाही, मात्र आमच्ये सुरुवातीपासून म्हणणं होतं की, भाजपसोबत जावे. अजित पवार हे देखील आधीपासूनच भाजपसोबत जायला तयार होते, असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाला आहे.

संजय राऊतांवर साधला निशाणा
यावेळी संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. सजंय राऊत यांच्यामुळे दारोदार भिक मागण्याची वेळ आली अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच संजय राऊत सुसंस्कृत नाहीत. त्यांना कळायला हवं होतं राज्यापालांशी कसं बोलावं. ते जे काही राज्यापालांना बोलले ते त्यांना बाळासाहेबांनी शिकवलं होतं का? असा सवालदेखील संजय शिरसाट यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Share This News
error: Content is protected !!