Pritam Munde

Pritam Munde : ‘मला राजकारणातील पांढरी पेशी व्हायचंय’ प्रीतम मुंडेंचं वक्तव्य

477 0

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमादरम्यान मला राजकारणातील तुरटी व्हायचंय, असं विधान केलं होतं. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांच्या भगिनी भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी मला राजकारणातील पांढरी पेशी व्हायचंय, असे विधान केले आहे. यामुळे या दोन्ही भगिनींच्या मनात काय सुरू आहे या चर्चेला उधाण आले आहे.

काय म्हणाल्या प्रीतम मुंडे?
आज समाजात मानसिक अपंगत्वच नाहीतर समाजात व्हायरल इन्फेक्शन झालेल्या प्रवृत्ती वाढत आहेत. त्या खूप वेगाने वाढत आहेत. आपण जिकडे तिकडे पाहतोय. त्यामुळे माझ्यातील डॉक्टर कधीकधी जागा होतो, त्यामुळं अशा प्रवृत्तींना नष्ट करण्यासाठी मला राजकारणातील पांढरी पेशी व्हायचंय, असं मोठं विधान प्रीतम मुंडे यांनी केले आहे. त्या बीडच्या परळीमध्ये दिव्यांग बांधवांना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

तसेच त्या पुढे म्हणाल्या हे उदाहरण देणं गरजेचं होतं. कारण अधूनमधूम माझ्यामधील डॉक्टर जागी होत असते. त्यामुळं कुणावर टीका टिप्पणी करणं हा काही हेतू नव्हता. आम्ही अठरा पगड जातीसाठी काम करणारे आहोत. आमचे कोणतेही कार्यक्रम दाखवण्यासाठी नसतात, दाखवण्यासाठी जो कार्यक्रम घेतो तो पेशंट कुठं आहे? हे पाहण्यापेक्षा आपला फोटो कसा चांगला येईल, याकडं लक्ष देतो, असे चमकू पुढारी तुम्हाला भरपूर मिळतील, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

Share This News
error: Content is protected !!