Laxman Madhavrao Pawar

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून भाजपला मोठा धक्का ! ‘या’ आमदाराने दिला राजीनामा

513 0

बीड : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा दिवसेंदिवस पेटताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं देखील सुरु करण्यात आली आहेत. यादरम्यान काही नेत्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. त्यातच आता हाती आलेल्या माहितीनुसार बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी भाजपच्या पहिल्या आमदाराने राजीनामा दिला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवून देण्यात आला आहे.

लक्ष्मण पवारांनी राजीनाम्यात काय म्हंटले ?
‘महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलिंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.’ असे लक्ष्मण पवार यांनी आपल्या राजीनाम्यात म्हंटले आहे.

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांचा राजीनामा
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी राजीनामा दिला आहे. मराठा समाजातील आरक्षणाच्या मागणी करावी यासाठी काही आंदोलक त्यांच्या भेटीसाठी गेले असता त्या ठिकाणी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी केली. त्यानंतर हेमंत पाटलांनी तात्काळ लोकसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा लिहून आंदोलकांना दिला.मराठा आरक्षणासाठी एखाद्या आमदार वा खासदाराने दिलेला हा पहिलाच राजीनामा आहे.

Share This News
error: Content is protected !!