Baba Siddique

Baba Siddique : काँग्रेसला मोठा धक्का ! बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामराम

340 0

मुंबई : लोकसभा निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मोठे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला आहे. बाबा सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. आपण तातडीने राजीनामा देत असल्याचे बाबा सिद्दीकी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.

बाबा सिद्दीकी यांनी पोस्टमध्ये काय लिहिले?
“मी तरुणपणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि 48 वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ राजीनामा देत आहे. मला व्यक्त करायचे आहे असे बरेच काही आहे, पण या म्हणीप्रमाणे काही गोष्टी न सांगितल्या गेलेल्याच बऱ्या. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो,” असे बाबा सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

EVM Theft : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ! ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी 3 अधिकारी निलंबित

Share This News
error: Content is protected !!