Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे दोन ‘निष्ठा’वंत आमदारांना डच्चू देणार? कोण आहे ‘हे’ दोन आमदार

278 0

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी कडून पुढील एक ते दोन दिवसांमध्ये जागावाटप निश्चित होऊन उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

विद्यमान दोन आमदारांची तिकीट उद्धव ठाकरे कापणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असून यामध्ये शिवडीचे आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधिमंडळ गटनेते अजय चौधरी आणि चेंबूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश फातर्फेकर या दोन आमदारांचा समावेश आहे.

दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवलेल्या आमदारांच्या बैठकीला या दोन्ही आमदारांना निमंत्रण नसल्याने ही चर्चा सुरू झाली आहे.

चेंबूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल पाटणकर इच्छुक आहेत तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अजय चौधरींच्या शिवडी मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला कमी लीड मिळाल्याने या दोन्ही या दोन्ही आमदारांच्या उमेदवारीला कात्री लागण्याची शक्यता असून उद्धव ठाकरे नव्या चेहर्यांना संधी देण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आता खरंच या दोन आमदारांची तिकीटं कापली जातात का हे पाहणं महत्त्वाचं असेल

Share This News
error: Content is protected !!