राज्यात विधानसभा निवडणूक घोषणा झाली असून 288 विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मोर्चे बांधणी करत असताना वंचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. आज वंचित बहुजन आघाडीची 16 उमेदवारांची चौथी यादी जाहीर झाली असून आतपर्यंत वंचित बहुजन आघाडी कडून घोषणा करण्यात आली आहे.
या अगोदर 21 सप्टेंबरला अकरा उमेदवारांची पहिली यादी वंचित बहुजन आघाडीने जाहीर केले होते त्यानंतर 9 ऑक्टोबरला दहा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली या दहा उमेदवारांमध्ये सर्व मुस्लिम उमेदवारांचा समावेश होता. त्यानंतर 16 ऑक्टोबरला 30 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आणि आज 16 उमेदवारांची चौथी यादी जाहीर करत वंचित बहुजन आघाडीने सर्वाधिक उमेदवारांची घोषणा केली आहे.