विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून एकाच टप्प्यामध्ये 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार आहे त्या 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आपल्या पाच उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे.
या यादीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांविरोधात मनसेकडून गणेश भोकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गणेश भोकरे यांच्याकडे सध्या कसबा विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी होती.
कोणत्या पाच उमेदवारांना मिळाली उमेदवारी?
कसबा पेठ गणेश भोकरे
चिखली गणेश बरबडे
कोल्हापूर उत्तर अभिजित राऊत
केज रमेश गालफाडे
कलिना संदीप उर्फ बाळकृष्ण हुटगी