Breaking News

संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्या परिवर्तन महाशक्तीच्या निवडणूक समन्वयपदी धनंजय जाधव यांची निवड

82 0

पुणे : परिवर्तन महाशक्तीच्या विधानसभा निवडणूक सुकाणू समितीच्या पुणे येथील बैठकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे धनंजय जाधव यांची समन्वयक तर सहसमन्वयक म्हणून प्रहार जनशक्तीचे गौरव जाधव तर स्वाभिमानी पक्षाचे योगेश पांडे या तिघांच्या नावाची अधिकृत निवडणूक समन्वयक म्हणून घोषणा करण्यात आली.

परिवर्तन महाशक्तीच्या सुकाणू समितीची बैठक पुण्यातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या कार्यालयात पार पडली या बैठकीला महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे छत्रपती, प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू, स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत सर्वानुमते महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे धनंजय जाधव यांची नावाची समन्वयक म्हणून निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. धनंजय जाधव , पांडे व गौरव जाधव हे तिघेही निवडणूक कालावधीत राज्य पातळीवर समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!