राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून महायुतीत आतापर्यंत 215 जागांची घोषणा झाली आहे. युतीतील तीनही पक्षांकडून विधानसभेची विशेष तयारी केली जात असतानाच आज रावसाहेब पाटील दानवे यांच्या कन्या संजना दानवे-जाधव या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
आज सायंकाळी संजना जाधव या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली असून त्या कन्नड सोयगाव या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत.