विशेष संपादकीय! घराणेशाहीला निवडून देणाऱ्या लोकशाहीचा ‘विजय’ असो!

516 0

विधानसभा 2024 च्या निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांची संख्या पाहाता महाराष्ट्राच्या राजकारणावर घराणेशाहीची पकड दिवसेंदिवस घट्ट होत चालल्याचं दिसून येत आहे. या निवडणूक निकालानंतर एक-दोन नव्हे, तर तब्बल 14 घराणी आणि त्यांच्याशी संबंधित नातेवाईक मंडळी राजकारणाच्या पटलावर आली आहेत.

लोकशाहीच्या मंदिरांत घराणेशाहीतली नातीगोती!

महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या लढाईत नात्यागोत्यांमध्ये आमनासामना पाहायला मिळणं हे काही नवीन नाही. पती-पत्नी, बाप-लेक, सख्खे भाऊ, चुलत भाऊ, काका-पुतण्या, नणंद-भावजय, सासू-सून, पिता-पुत्र अशा कितीतरी नात्यांच्या जोड्या एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या आपण पाहिल्या आहेत. यंदाची निवडणूक देखील याला अपवाद नव्हती. या निवडणुकीतही अशा अनेक जोड्या पाहायला मिळाल्या. जनतेनं नेहमीप्रमाणे या जोड्यांपैकी कुणा एकाला तरी निवडून आणण्याची कामगिरी करून दाखवली. जनतेच्या मतांच्या जोरावर कोणत्या उमेदवारांनी आपली घराणेशाही अबाधित राखण्यात यश मिळवलं पाहूयात…
1पुणे – बारामती (पवार घराणं) – (03 खासदार, 02 आमदार)
महाराष्ट्रातल्या राजकारणातलं बहुचर्चित घराणं म्हणजे शरद पवार यांचं घराणं! शरद पवार – राज्यसभा खासदार (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), कन्या सुप्रिया सुळे – बारामती लोकसभा खासदार (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), पुतणे अजित पवार – बारामती विधानसभा आमदार (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), सून सुनेत्रा पवार – राज्यसभा खासदार (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) आणि नातू रोहित पवार – कर्जत जामखेड विधानसभा आमदार (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)
……………
2 रायगड – श्रीवर्धन (तटकरे घराणं) – 01 खासदार, 01 आमदार)
रायगड जिल्ह्यातील सर्वश्रुत राजकीय घराणं म्हणजे सुनील तटकरे यांचं घराणं! सुनील तटकरे – रायगड लोकसभा खासदार (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), कन्या अदिती तटकरे – श्रीवर्धन – विधानसभा आमदार (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
………………
जालना – (दानवे घराणं) – (02 आमदार)
जालना जिल्ह्यातील सर्वश्रुत राजकीय घराणं म्हणजे माजी केंद्रीय राज्यमंत्री, माजी खासदार रावसाहेब दानवे यांचं घराणं! पुत्र संतोष दानवे – भोकरदन विधानसभा आमदार (भाजप), कन्या संजना जाधव – कन्नड (छ. संभाजीनगर) – विधानसभा आमदार (शिवसेना)
…………………
रत्नागिरी – (सामंत घराणं) – (02 आमदार)
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वश्रुत राजकीय घराणं म्हणजे राज्याचे माजी उद्योगमंत्री उदय सामंत यांचं घराणं! उदय सामंत – रत्नागिरी विधानसभा आमदार (शिवसेना), किरण सामंत (उदय सामंत यांचे सख्खे भाऊ) – राजापूर – विधानसभा आमदार (शिवसेना)
………
सिंधुदुर्ग – (राणे घराणं) – (01 खासदार, 02 आमदार)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वश्रुत राजकीय घराणं म्हणजे माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे यांचं घराणं! नारायण राणे – रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा खासदार (भाजप), पुत्र नितेश राणे – कणकवली विधानसभा आमदार (भाजप), पुत्र निलेश राणे – कुडाळ विधानसभा आमदार (शिवसेना)
………..
मुंबई – (ठाकरे घराणं) – (01 आमदार, नातेसंबंध घराणं – सरदेसाई – 01 आमदार)
महाराष्ट्रातील आणखी एक बहुचर्चित राजकीय घराणं म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं घराणं! पुत्र आदित्य ठाकरे – वरळी विधानसभा आमदार (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष), वरूण सरदेसाई (आदित्य ठाकरे यांचे सख्खे मावसभाऊ) – वांद्रे पूर्व विधानसभा आमदार (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)
…………….
ठाणे – (शिंदे घराणं) – (01 खासदार, 01 आमदार)
ठाणे जिल्ह्यातील सर्वश्रुत राजकीय घराणं म्हणजे माजी मुख्यमंत्री, विद्यमान आमदार एकनाथ शिंदे यांचं घराणं! एकनाथ शिंदे – कोपरी पाचपाखाडी विधानसभा आमदार (शिवसेना), पुत्र श्रीकांत शिंदे- कल्याण लोकसभा खासदार (शिवसेना)
……………
सांगली – इस्लामपूर (पाटील घराणं) – (01 आमदार, नातेसंबंध घराणं – देशमुख – 01 आमदार)
सांगली जिल्ह्यातील सर्वश्रुत राजकीय घराणं म्हणजे राजारामबापू पाटील तसेच त्यांचे पुत्र माजी मंत्री, विद्यमान आमदार जयंत पाटील यांचं घराणं! जयंत पाटील- इस्लामपूर – वाळवा – विधानसभा आमदार (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), सत्यजीत देशमुख (जयंत पाटील यांचे सख्खे साडू) – शिराळा विधानसभा आमदार (भाजप)
…………….
छत्रपती संभाजीनगर – (भुमरे घराणं) – (01 खासदार, 01 आमदार)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वश्रुत राजकीय घराणं म्हणजे माजी मंत्री, विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांचं घराणं! संदीपान भुमरे – छत्रपती संभाजीनगर खासदार (शिवसेना), पुत्र विलास भुमरे- पैठण विधानसभा आमदार (शिवसेना)
……………
अहल्यानगर – राहुरी (कर्डिले घराणं) – (01 आमदार, नातेसंबंध घराणं – जगताप – 01 आमदार)
अहल्यानगर जिल्ह्यातील सर्वश्रुत राजकीय घराणं म्हणजे माजी मंत्री, विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं घराणं! शिवाजीराव कर्डिले – राहुरी विधानसभा आमदार (भाजप), संग्राम जगताप (शिवाजीराव कर्डिले यांचे जावई) – अहल्यानगर शहर विधानसभा आमदार (राष्ट्रवादी काँग्रेस)
…………
नांदेड – भोकर (चव्हाण घराणं) – (01 खासदार, 01 आमदार)
नांदेड जिल्ह्यातील सर्वश्रुत राजकीय घराणं म्हणजे माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण तसेच त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री विद्यमान राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांचं घराणं! अशोक चव्हाण- विद्यमान राज्यसभा खासदार (भाजप), कन्या श्रीजया चव्हाण- भोकर विधानसभा आमदार (भाजप)
……………
सातारा – (छत्रपती भोसले घराणं) – (01 खासदार, 01 आमदार)
महाराष्ट्रातील आणखी एक बहुचर्चित राजकीय घराणं म्हणजे सातारा जिल्ह्यातील छत्रपती राजेघराणं! श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले – सातारा लोकसभा खासदार (भाजप), शिवेंद्रसिंहराजे भोसले (छत्रपती उदयनराजे यांचे चुलत बंधू) – सातारा विधानसभा आमदार (भाजप)
………………
बीड – परळी (मुंडे घराणं) – (02 आमदार)
बीड जिल्ह्यातील सर्वश्रुत राजकीय घराणं राजकीय घराणं म्हणजे माजी केंद्रीय मंत्री, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचं घराणं! कन्या पंकजा मुंडे – विधानपरिषद आमदार (भाजप), पुतणे धनंजय मुंडे (पंकजा मुंडे यांचे चुलत बंधू) – परळी विधानसभा आमदार (राष्ट्रवादी काँग्रेस)
……………..
नाशिक – येवला (भुजबळ घराणं) – (02 आमदार)
नाशिक जिल्ह्यातील सर्वश्रुत राजकीय घराणं म्हणजे माजी उपमुख्यमंत्री, विद्यमान आमदार छगन भुजबळ यांचं घराणं! छगन भुजबळ – येवला विधानसभा आमदार (राष्ट्रवादी काँग्रेस), पुत्र पंकज भुजबळ – विधानपरिषद आमदार (राष्ट्रवादी काँग्रेस)

एकूणच काय, तर जनतेनं निवडून दिलेल्या या विविध घराण्यांतील आमदार-खासदारांनी आपलं राजकीय अस्तित्व टिकवतानाच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला निवडून दिलं आहे, हेही लक्षात घ्यावं. असो, घराणेशाहीला निवडून देणाऱ्या लोकशाहीचा ‘विजय’ असो!

संदीप चव्हाण वृत्तसंपादक ‘TOP NEWS मराठी’

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!