महादेव जानकर वाढवणार महायुतीचे टेन्शन; विधानसभेला तब्बल इतक्या जागा लढवण्याची केली तयारी

239 0

राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडी निवडणुकीची जोरदार तयारी करताना पाहायला मिळत आहे.

राज्याच्या राजकारणाला सुसंस्कृत पर्याय देऊया असं म्हणत परिवर्तन महाशक्ती ही निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. परिवर्तन महाशक्ती मध्ये सामील होत प्रहार चे संस्थापक अचलपूरचे आमदार आणि राज्याचे माजी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महायुतीला पहिला धक्का दिल्यानंतर आता महायुतीतील आणखी एक घटक पक्ष साथ सोडण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय.

महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षांना राज्यात 288 विधानसभा मतदारसंघात लढण्याची तयारी केली असून सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास २८८ जागांवर निवडणूक लढणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. रासपची महायुतीकडे ३५ ते ४० जागांची मागणी आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यातच अजून जागा वाटप होत नसल्याने आमच्याशी चर्चेचा विषय नाही, असा टोला यावेळी महादेव जानकर यांनी लागावला आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide