Breaking News

ठरलं! हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार; कधी करणार पक्षप्रवेश?

368 0

इंदापूर: राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अशातचं आता अनेक जागांवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. यातीलच महायुतीमध्ये रस्सीखेच असणारी जागा म्हणजे इंदापूर विधानसभेची जागा या जागेवर राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार असून भाजपाचे हर्षवर्धन पाटील या ठिकाणी लढण्यासाठी इच्छुक होते.

हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर मधून लढणारच असा निर्धार केल्यानंतर आज त्यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक पार पडली ही बैठक असफल झाल्याची माहिती असून आता हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेणार आहेत. येत्या दोन दिवसात हर्षवर्धन पाटील पक्षप्रवेशाची अधिकृत तारीख जाहीर करणार असल्याचेही बोललं जात आहे

Share This News
error: Content is protected !!