भाजपला धक्का! माजी आमदार तृप्ती सावंत यांचा मनसेत प्रवेश; वांद्रे पूर्वमधून उमेदवारी

186 0

मुंबई: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक यांची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आल्याचा पाहायला मिळत असून 215 ते 220 जागांवर उमेदवार देण्याची तयारी मनसेने केली असून आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेनं भाजपाला मोठा धक्का दिला आहे.

वांद्रे पूर्वच्या माजी आमदार आणि मुंबईच्या भाजपाच्या उपाध्यक्ष तृप्ती सावंत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे.

तृप्ती सावंत या शिवसेनेचे दिवंगत आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत.

बाळा सावंत यांच्या निधनानंतर त्यांनी वांद्रे-पूर्वमधून पोटनिवडणूक लढवत नारायण राणे यांचा पराभव करत त्यांनी विजय मिळवला होता. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तृप्ती सावंत यांच्याऐवजी मुंबईचे माजी महापौर स्व. विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली मात्र त्या त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र आता महायुतीत ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला दिली असून झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी मिळाली आहे.

त्यामुळे आता तृप्ती सावंत यांनी मनसेत प्रवेश केला आहे. तृप्ती देसाई यांनी मनसेत प्रवेश करत उमेदवारी मिळवली आहे.

 

Share This News
error: Content is protected !!