इंदापूर मागील अनेक दिवसांपासून इंदापूर विधानसभा मतदारसंघात चांगला चर्चेत आला असून आता अखेर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे.
आज इंदापूर मध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत नंतर पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत असल्याची घोषणा करत मी व माझे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करत आहोत अशी घोषणाही त्यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरऐवजी दुसरा पर्याय सांगितला.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईतील सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीत नेमका काय घडलं याची माहिती ही हर्षवर्धन पाटील यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांची आपण शरद पवार यांच्या अगोदर भेट घेतली होती देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर ऐवजी दुसऱ्या जागेवरून निवडणूक लढवा असा पर्याय सांगितला मात्र मला तो मान्य नव्हता आणि मी विधानसभा निवडणूक लढवावी अशी माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती त्यामुळे आपण शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करत आहोत.