महाराष्ट्रात उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची चार उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत कोल्हापूर उत्तर मधील उमेदवार बदलण्यात आला आहे.
सोलापूर मध्य मधून चेतन नरोटे तर राहुल नार्वेकर यांच्या विरोधात कुलाबा मतदारसंघातून हिरा देवासी यांना उमेदवारी मिळाली आहे
कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी?
- अकोला पश्चिम साजिद खान
- कुलाबा हिरा देवासी
- सोलापूर शहर मध्य चेतन नरोटे
- कोल्हापूर उत्तर मधुरिमाराजे छत्रपती