KIRIT SOMAIYYA: ‘त्या’ नाराजीच्या पत्रानंतर भाजपाने किरीट सोमय्यांकडे सोपवली नवी जबाबदारी

204 0

काही दिवसांपूर्वी भाजपाकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 34 जणांची निवडणूक व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली होती या समितीमध्ये चुनाव आयोग संपर्कप्रमुख म्हणून माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांची नियुक्ती करण्यात आली होती.

तर नियुक्ती होताच अवघ्या काही तासातच किरीट सोमय्या यांनी भाजपाचे निवडणूक व्यवस्थापन प्रमुख माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांना एक पत्र लिहीत मला न विचारता ही जबाबदारी दिली गेली आहे. मी पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ताच राहणार अशा आशयाचं पत्र लिहीत आपली नाराजी व्यक् केले होती.

या पत्रानंतर किरीट सोमय्या हे स्वपक्षावर अर्थात भाजपावर नाराज आहेत की काय? अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर आता भाजपाने किरीट सोमय्या यांच्यावर आणखी एक नवी जबाबदारी स्वीकारली असून आता किरीट सोमय्या यांच्याकडे मतदाता विशेष संपर्क अभियानप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी किरीट सोमय्या यांना या जबाबदारीचे पत्र दिलं आहे.

Share This News
error: Content is protected !!