Manisha Kayande

Manisha Kaynade : ठाकरे गटाला मोठा धक्का ! आमदार मनिषा कायंदे शिंदे गटात करणार प्रवेश?

683 0

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kaynade) या आता शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मागच्या काही तासांपासून त्या नॉटरिचेबल आहेत. महाशिबिराच्या दिवशी संबंधित आमदार कायंदे (Manisha Kaynade) या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या आधीच ठाकरे गटाला मोठा धक्का; शिशिर शिंदे यांचा राजीनामा

कोण आहेत मनिषा कायंदे ?
लहानपणापासून संघाचे संस्कार झालेल्या कायंदे (Manisha kayande) यांना घरातूनच समाजसेवा आणि राजकारणाचं बाळकडू मिळालेलं आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला भाजपमधून सुरुवात केली आहे. लहानपणी त्या वडिलांसोबत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे ऐकायला जायच्या. त्यांचे वडिलांची ग्रामीण भागात नेत्रं शिबिरे भरवायचे. त्यामध्ये त्या आपल्या वडिलांना मदत करत होत्या.

शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पोळ यांना शाईफेक करत मारहाण

तब्बल 25 ते 30 वर्षे त्यांनी (Manisha Kaynade) भाजपमध्ये काम केलं. 2012 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांना शिवसेनेकडून त्यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली. नंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना विधानपरिषदेचे तिकीट दिले. विधान परिषदेवर जाणं हा आपल्या राजकीय प्रवासातील मोठा टर्निंग पॉइंट ठरला होता.

Share This News
error: Content is protected !!