Amit Thackeray

Amit Thackeray : ‘…हे भान सरकारला यावे’, अमित ठाकरेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल

491 0

मुंबई : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. यादरम्यान मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी एक पोस्ट करून सरकारवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज पुण्यस्मरणदिनी आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा गड-किल्ल्यांची दुरावस्था आणि त्याच्या डागडुजीचा मुद्दा मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर मांडला आहे.

काय लिहिले आहे पोस्टमध्ये?
अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आणि त्यानंतर ही पोस्ट लिहिली आहे. ‘‘महाराजांचे गड-किल्ले हे केवळ ऐतिहासिक वास्तू नाहीत, तर पराक्रमाची आणि शौर्याची स्मारकं आहेत. पण आजची त्यांची दुर्दशा बघवत नाही. शासनाने हजारो कोटी रुपये नव्या पुतळ्यांवर खर्च करण्यापेक्षा, शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड-किल्ल्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी खर्च करणं कितीतरी महत्त्वाचं आहे.’’

‘‘गड-किल्ल्यांचा आपला हा सुवर्ण इतिहास आजही आस धरून आहे. हा इतिहास जपायला हवा, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवा, हे भान सरकारला यावे आणि हे ऐतिहासिक वैभव निरंतर जपले जावे, हीच अपेक्षा. आज महाराजांच्या पुण्यस्मरणदिनी त्यांना नमन करून शपथ घेऊया कि स्वराज्यासाठीच्या त्यांच्या लढ्याच्या या ऐतिहासिक पाऊलखुणा जपण्यासाठीची आपली जबाबदारी आपण ओळखू. गड-किल्ल्यांच्या ऐतिहासिक पावित्र्याला आपल्या बेजबाबदार वर्तनाने कुठलाही धक्का लागणार नाही याची सर्वतोपरी दक्षता घेऊ.’’ अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hatkanangale Loksabha : आढावा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा

Pune News : पुण्यात शंभरी पार केलेले किती उमेदवार? काय सांगतो सर्व्हे

Navneet Kaur Rana : चर्चेतील लोकसभा उमेदवार : नवनीत राणा

LokSabha : उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर 

Unmesh Patil : भाजपला मोठा धक्का ! विद्यमान खासदार उन्मेष पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश

Crime News : धक्कादायक ! पती -पत्नी आणि मैत्रिणीचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Solapur Fire : अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

Bhiwandi News : भिवंडी हादरलं ! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू

Salabhasana : ‘शलभासन’ म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!