Amit Shah

Amit Shah : शिवसेना-राष्ट्रवादी कुणामुळे फुटली? अमित शाह यांनी दिले स्पष्टीकरण

794 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणखी एक पक्ष आपल्यासोबत घेण्याच्या तयारीत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यापूर्वीच शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला फोडल्याचा आरोप भाजपवर होत आहे. यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठे विधान केले आहे. हे पक्ष आम्ही फोडले नसून केवळ पुत्र-पुत्रीच्या प्रेमामुळे फुटले असल्याचे अमित शाह म्हणाले आहेत.

पुत्र-पुत्रीच्या प्रेमामुळे पक्षात फूट
अमित शहा म्हणाले, की मी पुन्हा पुन्हा सांगतो की, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष पुत्र-पुत्रीच्या मोहापायी विभागले आहेत. उद्धव ठाकरे यांना त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवायचं होतं, तर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीच्या नेत्या बनवायचे होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत काम करणाऱ्यांनी आधी उद्धव ठाकरेंना आपला नेता म्हणून स्वीकारले. पण त्यांनी आदित्य यांना आपला नेता मानण्यास नकार दिला. पवारांनाही आपली मुलगी सुळे यांना राष्ट्रवादीच्या नेत्या बनवायचे होते. हे मान्य करायला तयार नसलेल्या अनेकांनी पक्ष सोडले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सकडून नव्या कर्णधाराची घोषणा, ‘हा’ खेळाडू सांभाळणार टीमची कमान

Bhushan Gagrani : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आय़ुक्तपदी भूषण गगरानी यांची नियुक्ती

Rakhi Sawant : राखी सावंतच्या अडचणीमध्ये वाढ ! समीर वानखेडेंनी दाखल केला मानहानीचा गुन्हा

Lok Sabha Election 2024 : अजितदादा आणि धनंजय मुंडेंना मोठा धक्का! ‘या’ जवळच्या व्यक्तीने ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोडली साथ

Lok Sabha Election 2024 : अखेर ! शिरूरमध्ये अमोल कोल्हेंविरोधात महायुतीचा उमेदवार ठरला

Sunil Mane : सुनील माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश

Nitesh Karale Guruji : नितेश कराळे गुरुजी शरद पवार गटाकडून वर्धा लोकसभेची निवडणूक लढवणार?

Nitin Gadkari : “… तर मी कधीच राजकारणात आलो नसतो”; नितीन गडकरींनी सांगितली ‘ती’ आठवण

Pune Crime News : पुण्यात छेडछाडीला वैतागून एका 19 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

Halasana : हलासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!