आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारण

Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात?

मुंबई : मनिषा कायंदे (Manisha Kayande) या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार होत्या. त्यामुळे त्या आता शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यामुळे ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडे विधानपरिषदेत आमदारांची संख्या ९ वर आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे पण विधानपरिषद आमदारांची संख्या 9 आहे . त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी दावा ठोकण्याची दाट शक्यता आहे. सध्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे (Ambadas Danve) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे.

Manisha kayande : शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच मनिषा कायंदेकडे सोपवण्यात आली ‘ही’ जबाबदारी

शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. पक्ष सोडून जाणाऱ्यांवर दोषारोप करण्यापेक्षा स्वतः उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे अशी मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून गतिमान पद्धतीने जनतेची कामे करत आहेत. त्यामुळे मी ओरिजिनल शिवसेनेत प्रवेश करत आहे, असे मनिषा कायंदे म्हणाल्या. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनिषा कायंदे यांच्यावर शिवसेनेच्या सचिव व पक्ष प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली.

Ashish Deshmukh : आशिष देशमुखांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्यावर सोपवण्यात आली ‘ही’ मोठी जबाबदारी

मनीषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विधानपरिषदेतील पक्षीय संख्याबळ
भाजपा – 22
ठाकरे गट – 09
राष्ट्रवादी काँग्रेस – 09
शिंदे गट – 02
काँग्रेस -08
अपक्ष/इतर – 07
रिक्त जागा –  21