नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली असून लोकसभा सचिवालयाकडून राजकीय पक्षांना कार्यालयांचा वाटप करण्यात आले.
या कार्यालयांचा वाटप करत असताना लोकसभा सचिवालयाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा करण्यात आला असून शिवसेना शिंदे गटाचा उल्लेख शिवसेना शिंदे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उल्लेख शिवसेना UBT असा करण्यात आला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कार्यालय नाही
लोकसभा सचिवालयाकडून संख्याबळाच्या आधारे राजकीय पक्षांना कार्यालयांच वाटप करण्यात आलं असून यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कार्यालय मिळालं नाही आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे हे लोकसभेतील एकमेव खासदार आहेत तर राज्यसभेत प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार आणि नितीन पाटील असे तीन खासदार आहेत यामुळेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभा सचिवालयाने कार्यालय दिलं नाही आहे.