मुंबई : “जिथं राष्ट्रवादीची ताकद जास्त, तिथं कुणाचीही…!”; आढावा बैठकीत अजित पवारांचं विधान

239 0

मुंबई : “राज्यात कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या तर त्या लढविण्याची आपली तयारी असायला हवी.आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढाव्यात तसेच जिथे आपली ताकद जास्त असेल तिथे कोणाचीही मदत न घेता जागा लढवावी…!” असं अजित पवार म्हणाले.
मुंबईमधील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. आज अनेक पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भाषणं केली. पण आपापल्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची जागा निवडून येण्याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन अजित पवारांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास १५ वर्षे काँग्रेससोबत संसार केला.मात्र त्यातही काही ठिकाणी वेगळ्या निवडणुका लढवण्याची भूमिकाही घेतली.यातून केवळ समोरील विरोधकांचा पराभव झाला पाहिजे,ही भूमिका होती.येत्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि काँग्रेसकडून त्यांची भूमिका लवकरच मांडण्यात येईल.

Share This News
error: Content is protected !!