Ajit Pawar happy

दादा, सरकारमध्ये या, अजित पवार यांना ‘या’ मंत्र्याने दिली खुली ऑफर

658 0

शिर्डी : राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ( Ajit Pawar) यांच्याबाबत एक महत्वाचे वक्तव्य करताना एक मोठी खुली ऑफर दिली आहे. दादांनी पण सरकारमध्ये यावे ही आमची अपेक्षा आहे, असं राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर म्हणाले आहेत. त्यांच्या या ऑफरची (Offer) सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

नेमके काय म्हणाले दीपक केसरकर ?
दादा विरोधी पक्षाचे नेते आहेत. ते जबाबदार नेते आहेत. त्यांनी बेजबाबदार विधाने करू नये. संजय राऊत सारखे लोक रोज बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. मात्र दादा जेव्हा बोलतात ते जनता त्याला गांभीर्यांने घेते. सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये दादा आमच्या बरोबर आघाडीवर असतील याची मला खात्री आहे, असं सांगतानाच दादांनी पण सरकारमध्ये यावे ही आमची अपेक्षा आहे अशी खुली ऑफर दीपक केसरकर यांनी दिली आहे. त्यांच्या या ऑफरवर आता अजित पवार नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!