Ajit Pawar

Ajit Pawar : राज्य सरकारमध्ये अर्थखातं कसं मिळालं? अजित पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट

494 0

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्याला राज्य सरकारमध्ये अर्थखातं कसं मिळालं ? याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांचं वर्चस्व मान्य केल्यावर अर्थखातं मिळालं असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. अजित पवार अर्थमंत्री बनवलं तरी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadavis) यांच्याकडे अर्थखात्याची प्रत्येक फाईल जाईल, असा निर्णय अमित शाहांच्या बैठकीत झाला आणि त्यानंतरच अर्थखातं मिळाले असे अजित पवार म्हणाले आहेत. गृहमंत्री अमित शाहा भेटीत वित्त खाते हवे ही भूमिका मांडली होती. देवेंद्र फडणवीस यांना वित्त खातं ठेवायचं होतं, अर्थखात्याशी संबंधित फाईल फडणवीसांकडे जाईल नंतर सीएमकडे जाईल असं ठरवण्यात आलं. ही माझीच भूमिका असल्याचा खुलासादेखील अजित पवार यांनी यावेळी केला.

लोकसभा जागावाटपाबाबत भूमिका
आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत अजित पवार गटाची नवी भूमिका मांडल्याची माहिती अजित पवार गटाच्या वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे. लोकसभेत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी खराब कामगिरी असलेल्या खासदारांना डच्चू देण्यात यावा अशी भूमिका अजित पवार गटाकडून घेण्यात आली आहे. लवकरच महायुतीची बैठक घेण्यात येणार असून त्या बैठकीत खासदारांच्या कामगिरीबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Accident : एमआयटी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या रिक्षाचा भीषण अपघात; 5 विद्यार्थी जखमी

Women’s Reservation : महिलांना राजकीय आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसतील – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Devendra Fadnavis : ड्रग्ज तस्करांशी हातमिळवणी करणारे पोलिस बडतर्फ होणार; फडणवीसांची मोठी घोषणा

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

Beed News : ‘या’ कारणामुळे प्रकाश सोळंके यांच्या घरावरील हल्ला रोखता आला नाही; बीडच्या पोलीस अधीक्षकांचा मोठा खुलासा

Amravati News : अमरावतीमध्ये भीषण अपघात; ट्रॅक्टर पलटी होऊन 20 मजूर जखमी

Weather Update : राज्यात थंडीला सुरुवात; मात्र ‘या’ ठिकाणी आज पडणार पाऊस

Maratha Reservation : राजकीय हस्तक्षेपामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!