ajit pawar

AJIT PAWAR: मंत्रिमंडळ विस्तार कधी?; स्वतः अजित पवारांनी सांगितली तारीख

239 0

23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा (MAHARASHTRA VIDHANSABHA) निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर साधारणतः 12 दिवसांनी म्हणजे 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADANVIS) यांनी महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री (CHIEF MINISTER) म्हणून शपथ घेतली.

तर एकनाथ शिंदे (EKNATH SHINDE) आणि अजित पवार (AJIT PAWAR) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची (Deputy Chief Minister) शपथ घेतली.

त्यानंतर आता राज्यात सर्वांनाच मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले असून 16 डिसेंबर रोजी नागपूरला विधानसभेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) होणार असून त्या अगोदर मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असं बोललं जात असताना आता स्वतः अजित पवार यांनीच मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख सांगून टाकली आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार हे आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी संसद भवन मध्ये पोहोचले होते यावेळी खासदार सुनील तटकरे देखील अजित पवार यांच्या सोबत होते या बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं म्हटलं आहे.

अमित शाह यांच्यासोबत नेमकी काय झाली चर्चा 

या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती ही अजित पवार यांनी दिली असून अमित शहा यांच्यासोबत उसाच्या प्रश्नावर चर्चा झाली असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

आज सकाळीच अजित पवारांनी शरद पवारांचीही घेतली भेट 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस असून अजित पवार यांनी आज शरद पवारांच्या दिल्लीतील सहा जनपथ या निवासस्थानी जाऊन भेट घेत शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अजित पवार यांच्यासोबत राज्यसभा खासदार सुनेत्रा अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री व येवल्याचे विद्यमान आमदार छगन भुजबळ उपस्थित होते.

सुप्रिया सुळे यांनी केला होता अजित पवारांचे स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये पहिल्यांदाच तब्बल 45 मिनिटे भेट झाली यावेळी अजित पवार यांचा स्वागत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं पवार कुटुंबातील या गेट-टुगेदर ची सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

AJIT PAWAR MET SHARAD PAWAR: शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त पवार कुटुंबाचं “गेट-टुगेदर”; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

JAY AJIT PAWAR: अजित पवारांच्या लेकानं सांगितली मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख

Share This News
error: Content is protected !!