गुन्ह्याचा आणि गुन्हेगारांचा शोध घेणारा अत्यंत लोकप्रिय झालेला CID हा शो सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वर 21 डिसेंबर 2024 पासून पुनरागमन करण्यास सज्ज आहे. दर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 वाजता त्याचे प्रसारण करण्यात येईल. शिवाजी साटम (ACP प्रद्युमन), दयानंद शेट्टी (दया) आणि आदित्य श्रीवास्तव (अभिजीत) हे कलाकार पुन्हा एकदा त्याच्या गाजलेल्या भूमिकेत दिसणार आहेत. एका दिलखुलास मुलाखतीत या शोच्या पुनरागमनाबद्दल, पुन्हा प्रेक्षकांसमोर येण्याबद्दल असलेला रोमांच दयानंद शेट्टीच्या बोलण्यातून व्यक्त झाला. त्याने सांगितले की, नव्या सीझनमध्ये जुन्या आठवणींचे क्षण असतील आणि नवीन, वेधक केसिस व बरेच काही असेल.फक्त मीच नाही, तर संपूर्ण टीम खूप रोमांचित आहे. आणि त्याहीपेक्षा आमच्या चाहत्यांचा उत्साह तर विचारुच नका! आम्ही 6 वर्षांनी परत येत आहोत. आमच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, त्यांच्या भावना पाहिल्या की वाटते, हा शो आम्ही इतक्या लवकर बंद करायला नको होता. लोक या शो ला अजून फॉलो करतात, जुने एपिसोड आवडीने बघतात. लोक हा शो यूट्यूबवर, बसमध्ये किंवा टॅक्सीत बसूनही बघतात. असे वाटते की, त्यांचे केवळ या मालिकेशीच नाही, तर त्यातील व्यक्तिरेखांशीही एक नाते जडले आहे. त्यामुळे लोकांच्या आवडत्या दयाच्या रुपात परत येताना मला खूप आनंद होत आहे. हा दया आता CID च्या नवीन सीझनमध्ये बरेच दरवाजे तोडणार आहे असं अभिनेते दयानंद शेट्टी म्हणाले
