Bhagat Singh Koshyari

Bhagat Singh Koshyari : “अजित पवार यांची दया येते, कारण ते कायम…”, भगतसिंह कोश्यारींच्या त्या वक्तव्याची होतेय जोरदार चर्चा

914 0

महाविकास आघाडीचे सरकार असताना वादग्रस्त वक्तव्य आणि निर्णयांमुळे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची कारकीर्द कायम वादग्रस्त ठरली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीमुळे भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. आता भगतसिंह कोश्यारी यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं आहे. अजित पवार यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते तयार असतात, असे मिश्किल वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले भगतसिंग कोश्यारी?
भगतसिंह कोश्यारी यांना जेव्हा फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “अजित पवारांच्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. आपल्या उत्तराखंडमध्येही एक मोठे नेते आहेत. कितीही वेळा पराभव झाला, तरी ते हार मानत नाहीत. तसेच, अजित पवार आहेत. त्यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते कायम तयार असतात,” असे भगतसिंग कोश्यारी म्हणाले आहेत.

तसेच “शरद पवार देशातील ज्येष्ठ नेते आहेत. आजही सर्वजण शरद पवारांचा आदर करतात. व्यक्तिश: मी त्यांचा खूप आदर करतो. शरद पवारांना दोन विद्यापीठांची पदवी माझ्या हातून देण्याची संधी मिळाली. शरद पवार माझ्यापेक्षा आठ-दहा महिन्यांनी मोठे आहेत, त्यामुळे त्यांचा आदर करणे स्वाभाविक आहे. ते उत्तम राजकारणी आहेत,” अशा शब्दांत त्यांनी शरद पवार यांचे कौतुक केले आहे.

Share This News
error: Content is protected !!