Invitation card

Ajit Pawar : अजित पवारांची नवी खेळी ! बीडच्या सभेपूर्वीची ‘ती’ निमंत्रण पत्रिका व्हायरल

1569 0

बीड : अजित पवार (Ajit Pawar) गटाची आज पहिली जाहीर सभा बीडमध्ये होणार आहे. या (Ajit Pawar) सभेचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार नियोजन करण्यात आले आहे. अजित पवारांच्या स्वागतासाठी बीड शहरात ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मात्र यादरम्यान सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे ती या सभेच्या निमंत्रण पत्रिकेची.. आता तुम्ही म्हणाल असे काय आहे त्या पत्रिकेमध्ये? या पत्रिकेमध्ये अजित पवारांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांना साथ देत सरकारमध्ये सामील झाले होते. परंतु, शरद पवार हेच आमचे नेते राहतील, असे सातत्याने अजित पवार आणि त्यांच्या गटाकडून सांगण्यात येते. परंतु, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीड येथे अजित पवारांची सभा होणार असून यासाठी निमंत्रण पत्रिका छापण्यात आली आहे.

या निमंत्रण पत्रिकेवर अजित पवारांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू लागली आहे. यावर आता शरद पवार गटाची काय प्रतिक्रिया असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Share This News
error: Content is protected !!