अजित पवार पुन्हा गायब, पुण्यातील कार्यक्रमाला दादांची अनुपस्थिती

1774 0

विरोधी पक्षनेते अजित पवार काही दिवसांपूर्वी अचानक १७ तास नॉट रिचेबल राहिले अन् आज पुन्हा एकदा दादा अचानक गायब झाल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहणार होते. मात्र अजित पवार यांनी कार्यक्रम टाळल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार शेतकरी मेळाव्याला येणार नसल्यामुळे आयोजकांनी आयत्या वेळी शरद पवार, सुप्रिया सुळेंना निमंत्रित केलं.

खारघर येथील अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात अनेक भाविकांना उष्माघाताचा फटका बसून ११ भाविकांचा मृत्यू झाला. अजित पवार यांनी रविवारी रात्री नवी मुंबई येथील रुग्णालयात जाऊन उष्माघातामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची भेट घेतली. त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवादही साधला होता. आज पुन्हा एकदा दादा अचानक गायब झाल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

Share This News
error: Content is protected !!