Aaditya Thackeray

Aaditya Thackeray : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल

638 0

मुंबई : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरुद्ध शुक्रवारी मध्यरात्री एनएम जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
आदित्य ठाकरे यांनी बेकायदेशीर जमाव जमवून मुंबईतील लोअर परळ येथील उड्डाणपुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे उद्घाटन केले. मात्र, दुसऱ्या मार्गिकेची चाचणी झाली नसतानाही आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केल्याचा आरोप मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी आदित्य ठाकरेविरोधात आयपीसीच्या कलम 143, 149, 326 आणि 447 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया
बेकायदेशीर सरकार स्थापन झालंय त्यांच्याविरोधात गुन्हा का दाखल होत नाही.राजकीय हेतूने प्रेरित होऊन हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

UPI Payment : UPI युजर्ससाठी महत्वाची बातमी ! 31 डिसेंबरच्या आधी करा ‘हे’ काम अन्यथा यूपीआय नंबर होईल बंद

Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण; उसाचा ट्रॅक्टर पेटवला

Sassoon Hospital : ससून रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये पुन्हा बिघाड; डॉक्टर आणि नर्ससह 3 जण अडकले

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide