50 खोकी हा विषय केवळ रवी राणांच्या दिलगिरीचा नाही, 50 कोटी प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी व्हावी : आम आदमी पार्टी

389 0

आज बीजेपी आमदार रवी राणा यांनी माफी मागितली आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, या सरकारचे समर्थक आमदार बच्चू कडू व रवी राणे अशी चर्चा झाल्याचे समजते. हे सर्व सत्ताधारी बाकांवरील आमदार आहेत. दोघांमधील वाद चव्हाट्यावर येण्यास कारण ठरलंय गुवाहाटी आणि खोके. रवी राणांनी बच्चू कडू यांच्यावर टीका करताना ५० खोके घेतल्याचा आरोप केला आहे. बच्चू कडूंनी शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला आहे. रवी राणांनी केलेल्या आरोपांवर सुरूवातीला बच्चू कडूंनी मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे), उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) यांनाही यात भूमिका मांडण्याचं आवाहन केलं होतं.

खरे तर हा प्रश्न जनतेच्या पैशाचा आणि मतदारांच्या अपेक्षांभंगाचा आहे. हे सर्व फुटीर आमदार कोणत्या आमिषाला बळी पडले आहेत असा जनतेच्या मनात प्रश्न आहे. केला गेलेला आरोप हा तब्बल पन्नास कोटींचा आहे आणि शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांची संख्या पाहता ही रक्कम प्रचंड मोठी होते. हा गंभीर आरोप फक्त च्या दोघांमध्ये मिटवण्याचा नसून याची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. या आरोपाची चौकशी ईडी- सीबीआय मार्फत करायला हवी अशी मागणी आम आदमी पार्टीचे राज्यात अध्यक्ष रंगा राचुरे यांनी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!