अकोला: राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यस सुरुवात झाली असताना सर्व पक्ष मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळतायत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आतापर्यंत 7 उमेदवार जाहीर केले त्या खालोखाल एमआयएम पक्षानं आपले महाराष्ट्रात 5 उमेदवार जाहीर केले त्यानंतर आता उमेदवार जाहीर करण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीही पुढं आली असून वंचित बहुजन आघाडी कडून तब्बल 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून आज 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी?
-
निलेश विश्वकर्मा, धामणगाव रेल्वे, विधानसभा मतदार संघ
-
विकास रावसाहेब दांडगे, औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघ
-
किसन चव्हाण, शेवगाव विधानसभा मतदार संघ
-
फारुक अहमद, नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघ
-
डॉ. अविनाश रघुनाथ नन्हे, साकोली विधानसभा मतदार संघ
-
विनय भांगे, नागपूर दक्षिण पश्चिम, विधानसभा मतदार संघ
-
शिवा नरंगले, लोहा विधानसभा मतदार संघ
-
संग्राम कृष्णा माने, खानापूर विधानसभा मतदार संघ
-
सविता मुंढे, सिंदखेडराजा, विधानसभा
-
मेघा किरण डोंगरे, वाशिम विधानसभा मतदार संघ
-
शामिभा पाटील, रावेर विधानसभा मतदारसंघ