औंध, बोपोडी, बाणेर परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद

484 0

पुणे- महापालिकेच्या चतुश्रुंगी पाणी पुरवठा विभागाअंतर्गत सिंध सोसायटी समोरील मेट्रो मार्गात अडथळा ठरणारी पाण्याची लाईन बदलण्याचे काम येत्या गुरुवारी ( दि . २१ ) रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे औंध रस्ता, बोपोडी तसेच बाणेर परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी आणि उशिरा कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे .

पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणारा भाग पुढीलप्रमाणे – औंध गावठाण परिसर, आय.टी.आय. रोड परिसर, स्पायसर कॉलेज परिसर औंध रोड, बोपोडी गावठाण, मुंबई – पुणे रोड, भोईटे वस्ती, सानेवाड़ी, आनंद पार्क, दर्शन पार्क परिसर, डी – मार्ट परिसर बाणेर फाटा ते महाबळेश्वर हॉटेल दोन्ही बाजूचा परिसर, वर्षा पार्क , माउली मंगल कार्यालय परिसर

Share This News
error: Content is protected !!