फोटो काढणाऱ्या मुलीला हत्तीने अशी काही सोंड मारली की…… पाहा व्हिडिओ

139 0

नवी दिल्ली- नॅशनल पार्क किंवा प्राणीसंग्रहायलात गेल्यानंतर प्राण्यांसोबत फोटो काढण्याचा मोह प्रत्येकाला होतोच. पण ज्या प्राण्यांसोबत आपला फोटो काढायचा आहे, त्या प्राण्याला ते आवडले का याचा मात्र विचार केला जात नाही. असाच एक गमतीदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सात जणांचा एक ग्रुप हत्तीच्या समोर उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वजण त्या महाकाय हत्तीकडे बघत हसत आहेत. व्हिडिओमध्ये दोन मुली हत्तीच्या सोंडेला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याचवेळी शेजारी उभी असलेली एक मुलगी तिचा स्मार्टफोन काढते आणि गुपचूप हत्तीचा व्हिडिओ तयार करू लागते.

पण गजराजांना तिचे हे कृत्य अजिबात आवडले नाही. त्यांनी त्या मुलीला आपल्या सोंडेने असा काही जोरदार फटका दिला की ती मुलगी कोलमडून पडली. एवढेच नाही तर गजराजानी तिचा स्मार्टफोन आपल्या सोंडेने उचलण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एका मुलाने तो फोन उचलला म्हणून बरे ! @cctv_idiots नावाच्या हँडलने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि सात हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.

Share This News
error: Content is protected !!