गाडीच्या नंबरप्लेटवरील मजेशीर मजकूर वाचून उत्तरप्रदेश पोलिसांनी केलं “असं” ; जे वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही

475 0

मुंबई पोलीस फिल्मी गाणी आणि सीनच्या माध्यमातून अनेकदा लोकांना संदेश देत असतात. अशात उत्तर प्रदेश पोलीसही आता यात मागे नाहीत. उत्तर प्रदेश पोलिसांच्या औरैया विभागाने केलेलं एक ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.

या ट्विटमध्ये अभिषेक वर्मा यांनी 3 मुलांचा गुन्हा अतिशय क्रिएटिव्ह पद्धतीने सांगितला आहे आणि त्यांची शिक्षाही दाखवली आहे.

 

विनोद योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीसोबतच करावा, अन्यथा परिणाम वाईट होऊ शकतो, असं म्हणतात. हीच गोष्ट औरैयाच्या 3 पोरांना समजली असती तर होळीपूर्वी ते जेलची हवा खात नसते. नव्या जमान्यातल्या बेफिकीर तरुणांनी बाईकवर ट्रिपलिंग केलं, त्यावरही नंबर प्लेटवर नंबरऐवजी असा मजकूर लिहिला की वाचून हसू येईल. यूपी पोलिसांना हे आवडलं नाही आणि सणाआधीच या तरुणांना जेलची हवा खावी लागली.

 

 

Share This News
error: Content is protected !!